

Baby brain development first year
esakal
मेंदूतील बदल खूप प्रमाणात एकमेकांवर अवलंबून असतात. काही कारणाने बाळ बसूच नाही शकले, तर सभोवतालचा परिसर बघणार कसे? ते नाही झाले तर शोध घेण्याची उत्सुकता निर्माण कशी होणार? ते नाही झाले तर बौद्धिक विकास अडकणारच. पहिल्या वर्षभरात बाळाशी कुणी खेळलेच नाही, माणसे भेटलीच नाहीत, बाळाशी कुणी गप्पा मारल्याच नाहीत तर बाळाचा भाषिक-सामाजिक विकास कसा होणार?