

Khardung La Pass Cycling
Sakal
शेवटचे पाच किलोमीटर तर अत्यंत खडतर होते! बोबडी वळणं म्हणजे काय असतं हे पदोपदी कळत होतं. जीवावर उदार होऊन उणे पाच तापमानात जे समोर आलं त्यावर विश्वासच बसत नव्हता! मी १७,५८२ फुटांवर सायकलनं आलो होतो! लडाखच्या भाषेत म्हटलं, ‘पर्वतीय देवतांचा विजय असो!’ समोरच असलेले आर्मीचे जवान कौतुकानं बघत होते. नकळत मी त्यांना सॅल्युट ठोकला... ‘जय हिंद’...
अस्युत्तरस्यां दिशि देवतात्मा हिमालयो नाम नगाधिराजः ।
पूर्वापरौ तोयनिधी वगाह्य स्थितः पृथिव्यां इव मानदण्डः ॥