डॉ. पराग संचेती
आपल्या देशासाठी वैद्यकीय पर्यटन परिवर्तनात्मक ठरत आहे. परदेशांत राहणारे रुग्ण आधुनिक वैद्यकीय सोईसुविधा मिळवण्यासाठी देशाच्या सीमा ओलांडून भारतात येत आहेत. देशाच्या दृष्टीने हा अनोख्या परिवर्तनाचा आरंभ आहे.
वैद्यकीय पर्यटनात पुण्यातील रुग्णालये वेगाने पुढे येत आहेत. विविध रुग्णालयांमध्ये आता परदेशी रुग्णांसाठी स्वतंत्र विभाग सुरू केला आहे. आजारांच्या चिकित्सेतील निपुणता, प्रदीर्घ अनुभव असलेले वैद्य आणि रुग्णसेवेला दिलेले प्राधान्य या जमेच्या बाजू असल्याने जागतिक नकाशावर पुण्यातील रुग्णालयांनी सोनेरी ठसा उमटवला आहे.
या रुग्णालयांनी ओमान, केनिया, टांझानिया आणि नायजेरिया अशा देशांमध्ये बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) सुरू केले आहेत. या विभागांमध्ये रुग्णांना विविध तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन आणि सल्ले मिळत आहेत.