
रमा परांजपे
हळूहळू पिल्लांशी खेळायला माझे, दादाचे, ताईचे, वहिनीचे असे सगळ्यांचे मित्रमैत्रिणी यायला लागले. एका हातात चहाचा कप आणि दुसऱ्या हातात तेवढ्याच आकाराचं पिल्लू असं चित्रं जवळपास रोजच संध्याकाळी असायचं. थोड्या दिवसांतच माझे मित्रमैत्रिणी पिल्लांना दत्तक घ्यायचं म्हणून मागे लागले.