Premium|Rajasthan Blue Pottery : जयपूरची ब्लू पॉटरी; मरुभूमीत रुजलेली पर्यावरणपूरक निळी कलेची परंपरा आणि पुनरुज्जीवनाची कहाणी

Eco-Friendly Art of Rajasthan : राजस्थानच्या प्रसिद्ध ब्लू पॉटरीची वैशिष्ट्यपूर्ण निर्मिती, निळा रंग, नाजूक नक्षीकाम आणि पर्यावरणपूरक प्रक्रिया यामुळे ही पारंपरिक हस्तकला इतर सिरॅमिक्सपेक्षा वेगळी ठरते.
Eco-Friendly Art of Rajasthan

Eco-Friendly Art of Rajasthan

esakal

Updated on

वर्षा गजेंद्रगडकर

इतर सिरॅमिक्सचा विचार करता, ब्लू पॉटरी अधिक पर्यावरणपूरक आहे. एक तर कमी तापमानात वस्तू भाजल्यामुळे ऊर्जेची बचत होते आणि इतर मातीच्या भांड्यांपेक्षा त्यांचा टिकाऊपणाही वाढतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, शिसाचा किंवा इतर विषारी घटकांचा वापर होत नसल्यामुळे मानवी आरोग्याला आणि पर्यावरणाला कमीत कमी धोका पोहोचतो.

राजस्थानचा भूप्रदेश त्याच्या अनेक ओळखींसाठी प्रसिद्ध आहे. विस्तीर्ण वाळवंट आणि वैशिष्ट्यपूर्ण जैवविविधता ही त्याची नैसर्गिक ओळख आहे. राजपूत योद्ध्यांच्या आणि सम्राटांच्या शौर्यानं इथल्या इतिहासाला तेज दिलं आहे आणि इथल्या कलासंस्कृतीनं या मरुभूमीला नाना रंगांत न्हाऊ घातलं आहे. राजस्थानची बांधणी वस्त्रकला, मीनाकारी दागिने, पिचवाई पेंटिंग्ज, रंगीत धाग्यांची वीण असलेल्या मोजड्या, कठपुतळी बाहुल्या या सगळ्या हस्तकलांनी मैलोनमैल पसरलेल्या या वाळवंटाला विलक्षण चैतन्य दिलं आहे. याच कलापरंपरेचा एक ठसठशीत पुरावा म्हणजे इथली अपूर्व अशी ब्लू पॉटरी.

ब्लू पॉटरी हा सिरॅमिक पॉटरीचा एक प्रकार आहे. ही पॉटरी विशेष लक्ष वेधून घेते, ती तिच्या उजळ निळ्या रंगामुळे आणि नाजूक नक्षीमुळे. भारतातली मातीची भांडी सहसा माती किंवा चिखल वापरून तयार केली जातात. पण ब्लू पॉटरी मात्र क्वार्ट्‌झ दगडाची पूड, काचेची पूड, मुलतानी माती, बोरॅक्स, डिंक आणि पाणी यांच्या मिश्रणातून तयार होते. नजर खिळवणारा निळा रंग कोबाल्ट ऑक्साइडपासून मिळतो आणि इतर धातूंची ऑक्साइड्स वापरून पिवळा, हिरवा आणि तपकिरी रंग मिळवले जातात. ब्लू पॉटरीवर फुलं, पानं, प्राणी, पक्षी आणि भौमितिक नक्षी असते. पर्शियन, मुघल आणि अस्सल भारतीय प्रतिमा ब्लू पॉटरीमध्ये जिवंत झाल्यासारख्या वाटतात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com