Reading : वाचन हे चौरस आहारासाखे असावे.

इंग्रजी लिहिता, वाचता न येणारी मंडळी फार मोठ्या ज्ञानस्रोतापासून कायम वंचित राहतात. मातृभाषेवर प्रेम हवेच, पण..
Sachin Tendulkar reading
Sachin Tendulkar readingesakal

मला वाचायला खूप आवडते, पण वेळच मिळत नाही... काय वाचू ते कळत नाही... अशा सबबींवर मात करायची असेल, वाचन वाढवायचे असेल – मग ती पुस्तकाची हार्ड कॉपी असो, अथवा ई-बुक – या काही गोष्टी करून बघायला हव्यात.

प्रफुल्ल वानखेडे

हल्ली आपण तासन तास स्क्रीन पाहतो. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा सोशल मीडिया ॲपना टायमर लावा.

पुस्तक वाचनाचा प्राधान्यक्रम ठरवा. म्हणजे मला नक्की काय वाचायचे आहे, व्यवसायाशी निगडित विषयांवरची पुस्तके वाचायची आहेत, नुसतेच मनोरंजनात्मक वाचायचे आहे की कथा, कादंबऱ्या वाचायच्या आहेत ते ठरवा आणि त्याचा प्राधान्यक्रमही ठरवा. आणि कधी काय वाचायचे आहे, हेसुद्धा ठरवा.

एकावेळी दोन-तीन पुस्तके बरोबर ठेवावीत. एक कंटाळवाणे वाटले, तर लगेच दुसरे घ्यायचे. म्हणजे वाचन सुरू राहते.

Sachin Tendulkar reading
Book Reading Benefits : स्ट्रेस कमी करायचाय? मग दररोज पुस्तक वाचा...

पुस्तक वाचताना एकांत मिळेल अशीच जागा असावी. टीव्ही, कॉम्प्युटरसमोर बसून वाचू नका. मोबाईल दूरच ठेवा.

आपल्या आवडीची किंवा आपल्या व्यवसायाशी संबंधित असलेली पुस्तके निवडा. सगळे वाचतात म्हणून मीसुद्धा अमुक एक पुस्तक वाचायला हवे, असे नसते. सगळ्यांना आवडणारे पुस्तक तुम्हाला आवडेलच असे नाही.

एखादे पुस्तक चांगले वाटले तर किमान दोन वेळा तरी वाचावे. दुसऱ्या वेळी नोट्स काढाव्यात. दुसऱ्या वेळी ते पुस्तक नव्याने गवसते. मी स्वतः बरीच पुस्तके चार-पाच वेळाही वाचतो.

दिवसाचे, आठवड्याचे, महिन्याचे असे वाचनाचे टारगेट ठरवा आणि ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करा, म्हणजे मी दिवसाला इतकी पाने वाचेन, या आठवड्यात एक पुस्तक संपवेन वगैरे. त्याचा हिशोब ठेवावा, म्हणजे स्वतःलाच आव्हान मिळते, आणि ठरवलेले टार्गेट पूर्ण झाले की अलौकिक आनंद मिळतो.

वाचन ही फक्त आवड नाही तर ते एक कौशल्य आहे. हे कौशल्य विकसित करायचे आहे. नोट्स काढणे, पुस्तकातील काही वाक्ये लक्षात ठेवणे ही कौशल्ये आहेत. आणि पुस्तकात वाचलेल्या काही गोष्टी प्रत्यक्षात वापरणे हे त्याहून मोठे कौशल्य आहे.

भाषांतरित पुस्तके वाचायला हवीत. इतर भाषांमधील पुस्तके आपण वाचतो, पुस्तकांमधून संस्कृती वाचतो, तेव्हा आपल्यातील सर्वसमावेशक माणूस जागा होतो.

Sachin Tendulkar reading
Importance Of Reading: काय आहेत पुस्तक वाचण्याचे फायदे?

ज्यांना इंग्रजी वाचता येते त्यांनी मूळ इंग्रजीतीलच पुस्तक वाचावे. कारण इंग्रजी बोलता येणे, लिहिता येणे हे आजच्या कॉर्पोरेट युगात फार गरजेचे आहे. इंग्रजी लिहिता, वाचता न येणारी मंडळी फार मोठ्या ज्ञानस्रोतापासून कायम वंचित राहतात. मातृभाषेवर प्रेम हवेच, पण जागतिकीकरणात पाय रोवून उभे राहायचे असेल, पुढे जायचे असेल तर इंग्रजीला पर्याय नाही.

आपल्या क्षेत्रासंबंधात जेवढे जास्तीत जास्त वाचता येईल तेवढे वाचा. दर आठवड्याला विविध लेख, जुनी बेसिक रेफरन्स बुक्स, नव्या घडामोडी, शोध वगैरे. तसेच कमीतकमी एक तरी पुस्तक वाचायचे हा ध्यास हवा आणि तशी कृती हवी.

एका चांगल्या पुस्तकात किमान दोन-तीन तरी अजून चांगली पुस्तके सापडतात. बऱ्याच इंग्रजी पुस्तकांत तिथल्या तिथे किंवा पानाच्या खाली रेफरन्स देण्याची पद्धत अत्यंत दर्जेदार असते, तसेच शेवटची काही पाने क्रेडिट देण्यासाठीची, त्यातूनही माहितीचे भांडार खुले होते.

वाचकांबरोबच लेखक आणि प्रकाशकांनीही एक संकल्प करायला हवा, असे वाटते. मराठी पुस्तके फक्त हार्ड कॉपी स्वरूपातच प्रकाशित होतात. अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचायचे असेल तर ऑडिओ बुक, ई-बुक, ब्रेल अशा स्वरूपातही पुस्तके यायला हवीत.

माझ्या मते, वाचन हे चौरस आहारासाखे असावे. योग्य आहाराने जसे शरीर बळकट, निरोगी होते, तसेच चौफेर वाचनामुळे मेंदू सुदृढ होतो. वाचनाने अगदी सर्वसामान्य माणूसही असामान्य कामगिरी करू शकतो हे लक्षात घ्या, आणि वाचनाला सुरुवात करा.

-------------------

Sachin Tendulkar reading
Reading Benefits : वाचनाची सवय तुमचे मानसिक आरोग्य आणि आयुर्मान देखील वाढवते, जाणून घ्या ‘हे’ फायदे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com