Gazpacho: गारवा देणारे थंड सूप

क्लासिक गाझपाचो, सफेद गाझपाचो, हिरवा गाझपाचो, कलिंगडाचा गाझपाचो.!
gazpacho
gazpachoEsakal

अनघा देसाई

क्लासिक गाझपाचो

वाढप : ४ व्यक्तींसाठी

साहित्य : एक किलो टोमॅटो, १ मध्यम काकडी, १ सिमला मिरची, अर्धा लाल कांदा, २ लसूण पाकळ्या, ३ मोठे चमचे ऑलिव्ह तेल, २ मोठे चमचे व्हिनेगर, अर्धा चमचा जिरे पूड, १ चमचा किंवा चवीप्रमाणे मीठ, अर्धा चमचा मिरीपूड, ब्रेडचा १ जाड काप.

कृती : देठाचा भाग काढून टोमॅटो बारीक चिरावेत. सिमला मिरची देठ आणि पांढरा गाभा काढून बारीक चिरावी. काकडी सोलून बिया काढून तुकडे करावेत. भाज्या व इतर सर्व साहित्य एकत्र करून अर्धा तास मुरू द्यावे. नंतर ब्लेंडरमध्ये बारीक करावे. फ्रीजमध्ये कमीतकमी ४ तास थंड करून आस्वाद घ्यावा.

सफेद गाझपाचो

वाढप : ४ व्यक्तींसाठी

साहित्य : ब्रेडचे २ काप, १ कप बदाम, २ कप हिरवी द्राक्षे, पाव पांढरा कांदा, २ लसूण पाकळ्या, १ हिरवी मिरची बिया काढून (ऐच्छिक), ३ सफेद लहान काकड्या, एका लिंबाची किसलेली साल, अर्धा चमचा अॅपल सायडर व्हिनेगर, मीठ चवीप्रमाणे, मिरीपूड आवडीप्रमाणे, २ मोठे चमचे ऑलिव्ह तेल, १ कप पाणी.

सजावटीसाठी : लिंबाची किसलेली साल, चिमूटभर मिरची पूड, पुदिना पाने आणि द्राक्षाचे काप.

कृती : बदाम गरम पाण्यात भिजवून सोलून घ्यावेत. ब्रेड पाण्यात भिजवून पिळून घ्यावा. काकड्या सोलून बारीक तुकडे करावेत. सर्व साहित्य एकत्र करून ब्लेंडरमध्ये बारीक करावे. ४ तास थंड करून लिंबाच्या सालीचा कीस, पुदिना पाने, द्राक्षाचे काप यांनी सजवून, मिरची पूड भुरभुरून सर्व्ह करावे.

हिरवा गाझपाचो

वाढप : ४ व्यक्तींसाठी

साहित्य : दोन कप सेलरी, २ कप पाणी, २ लहान झुकिनी, ४ मध्यम हिरव्या काकड्या, १ पिवळी सिमला मिरची, पाव कप पांढरा कांदा, अर्धा कप पार्सली, पाव कप कोथिंबीर, १०-१२ पालकाची पाने, पाव कप लिंबाचा रस, १ मोठा चमचा ऑलिव्ह तेल, १ चमचा धने पूड, १ चमचा जिरेपूड, मीठ चवीप्रमाणे, मिरीपूड आवडीप्रमाणे.

कृती : सेलरीमध्ये पाणी घालून मिक्सरमध्ये बारीक करून सेलरीचा रस गाळून तयार ठेवावा. सर्व भाज्याचे बारीक काप करून घ्यावेत. सेलरीचा रस, भाज्यांचे काप (थोडे काप सजावटीसाठी वगळून) आणि इतर साहित्य ब्लेंडरमध्ये बारीक करून, फ्रीजमध्ये कमीतकमी २ तास थंड करावे. सर्व्ह करताना वरून भाज्यांचे काप घालून सजवावे.

आंब्याचा गाझपाचो

वाढप : ४ व्यक्तींसाठी

साहित्य : दोन कप आंब्याचे तुकडे, २ कप संत्र्याचा रस, १ काकडी, १ लाल सिमला मिरची, १ लसूण पाकळी, अर्धा लहान कांदा, ३ मोठे चमचे लिंबाचा रस, १ मोठा चमचा ऑलिव्ह तेल, मीठ चवीप्रमाणे, मिरीपूड आवडीप्रमाणे.

कृती : काकडी, सिमला मिरची आणि कांद्याचे तुकडे करावेत. आंब्याचे तुकडे, संत्र्याचा रस आणि ऑलिव्ह तेल ब्लेंडरमध्ये बारीक करावे. नंतर उरलेले साहित्य घालून पूर्ण बारीक न करता फिरवून घ्यावे. मीठ, मिरीपूड मिसळून फ्रीजमध्ये ४ तास थंड करावे.

स्वीट कॉर्न गाझपाचो

वाढप : २-३ व्यक्तींसाठी

साहित्य : तीन मक्याच्या कणसांचे दाणे, २ पिवळे/हिरवे टोमॅटो, १ पिवळी सिमला मिरची, १ मध्यम पांढरी काकडी, पाव कप ऑलिव्ह तेल, २ मोठे चमचे शेरी व्हिनेगर, १ लसूण पाकळी, पाव पांढरा कांदा, मीठ चवीनुसार, काळी मिरीपूड आवडीप्रमाणे.

कृती : मक्याच्या कणसाचे दाणे १ मिनिट पाण्यात उकळून थंड पाण्यात टाकावे. गाळून घ्यावे. सर्व साहित्य ब्लेंडरमध्ये बारीक करून २-४ तास फ्रीजमध्ये थंड करून सर्व्ह करावे.

sweet corn gazpacho
sweet corn gazpachoEsakal

अननसाचा गाझपाचो

वाढप : ४ व्यक्तींसाठी

साहित्य : अर्धा कप अननसाचे तुकडे, अर्धी पिवळी सिमला मिरची, पाव लहान लाल कांदा, १ लहान काकडी, २ चमचे लिंबाचा रस, एक अष्टमांश चमचा सफेद मिरीपूड, १ चमचा साखर, मीठ चवीनुसार.

सजावटीसाठी : लाल, हिरव्या, पिवळ्या सिमला मिरच्यांचे बारीक काप.

कृती : काकडी सोलून, बिया काढून तुकडे करावेत. सिमला मिरचीचेही तुकडे करून घ्यावेत. सर्व साहित्य एकत्र करून फूड प्रोसेसरमध्ये बारीक करावे. फ्रीजमध्ये कमीतकमी ४ तास थंड करून सिमला मिरचीच्या कापांनी सजवून सर्व्ह करावे.

खरबुजाचा गाझपाचो

वाढप : ४ व्यक्तींसाठी

साहित्य : एक खरबूज, १ काकडी, १ कप हिरवी द्राक्षे, २ मोठे चमचे चिरलेला कांदा, २ मोठे चमचे व्हिनेगर, पाव कप ऑलिव्ह तेल, मीठ चवीनुसार, मिरीपूड आवडीप्रमाणे, ६ बेसिल पाने.

कृती : खरबूज आणि काकडी सोलून बिया काढून तुकडे करावे. सर्व साहित्य एकत्र करून फूड प्रोसेसरमध्ये बारीक करावे. ४ तास फ्रीजमध्ये थंड करून सर्व्ह करावे.

कलिंगडाचा गाझपाचो

वाढप : ४ व्यक्तींसाठी

साहित्य : अर्धा कप कलिंगडाचे तुकडे, ३ मोठे टोमॅटो, १ लहान काकडी, १ मध्यम लाल सिमला मिरची, अर्धा लहान लाल कांदा, २ पाकळ्या लसूण, एक तृतीयांश कप पुदिना पाने, ३ मोठे चमचे ऑलिव्ह तेल, ३ मोठे चमचे शेरी व्हिनेगर, १ चमचा मीठ, अर्धा चमचा काळी मिरी पूड, पाव चमचा जिरे पूड, ब्रेडचा १ जाडसर काप.

कृती : काकडी सोलून तुकडे करावेत. इतर भाज्यांचेही तुकडे करून घ्यावेत. ब्रेड पाण्यात भिजवून पिळून घ्यावा. सर्व साहित्य एकत्र करून फूड प्रोसेसरमध्ये बारीक करावे. फ्रीजमध्ये ४ तास थंड करून सर्व्ह करावे.

----------------------

gazpacho
Summer Holiday : सुट्टी एके सुट्टी! रानमेवा लुटूया, करू वनाशी गट्टी.!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com