

Health Risks of Repeatedly Heated Oil
esakal
डॉ. सुबोध देशमुख
घराघरांत किंवा हॉटेल्समध्ये एकदा कढईत तळलेले तेल उरले की ते पुन्हा भाजीच्या फोडणीसाठी किंवा नवीन पदार्थ तळण्यासाठी वापरले जाते. तेल वारंवार गरम केल्याने त्यातील रासायनिक रचना बदलते, आणि त्यात ‘ॲक्रिलामाइड’सारखे कर्करोगाला आमंत्रण देणारे विषारी घटक तयार होतात.
आपल्या स्वयंपाकघरात रोज वापरले जाणारे तूप आणि तेल यांवरून आजकाल आरोग्याच्या वर्तुळात मोठी चर्चा पाहायला मिळते. स्निग्ध पदार्थ (फॅट्स) खाल्ल्याने वजन वाढते किंवा हृदयविकार होतो, या भीतीपोटी अनेक लोकांनी अन्नातून तूप आणि तेल पूर्णपणे वर्ज्य करण्यास सुरुवात केली आहे. मात्र दुसरीकडे आयुर्वेद आणि आधुनिक पोषणशास्त्र दोन्हीही स्पष्ट सांगतात, की शरीर निरोगी ठेवण्यासाठी योग्य स्निग्ध पदार्थांची अत्यंत गरज असते. तेल पूर्णपणे बंद करणे जेवढे चुकीचे आहे, तेवढेच अयोग्य तेलाचा वापर करणेही घातक आहे. घरगुती तूप आणि वेगवेगळ्या तेलांचे नेमके आरोग्यशास्त्र काय आहे आणि आपल्या दैनंदिन स्वयंपाकात त्यांचा योग्य वापर कसा करावा, हे सोप्या भाषेत समजून घेऊ या.