स्वयंपाकघर ते १७ हजार सूक्ष्मजीवांचे संशोधन करणारी महत्वाची संस्था; असा आहे विवेकानंद पर्वतीय कृषी संशोधन संस्थेचा प्रवास.!

भविष्यात २०५०पर्यंतची विशेष धोरणात्मक आखणी केलेल्या या संस्थेत भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या विविध संस्था आणि कृषी विद्यापीठांच्या सहयोगातून नवनवीन पिके तसेच अळिंबीविषयक संशोधन जोमाने सुरू आहे
ICAR-Vivekananda Parvatiya Krishi Anusandhan Sansthan, Almora
ICAR-Vivekananda Parvatiya Krishi Anusandhan Sansthan, AlmoraEsakal

सुधीर फाकटकर

स्वातंत्र्यपूर्वकाळातल्या बंगाल प्रांतातील प्रा. बोशी सेन हे सर जगदीशचंद्र बोस यांचे विद्यार्थी होते. विद्यार्थिदशेतच त्यांचा पाश्‍चात्त्य देशांत प्रवास झाला होता. परतल्यानंतर १९२६ साली त्यांनी कोलकत्यातील स्वतःच्या घरातील स्वयंपाकघरात प्रयोगशाळा सुरू केली आणि स्वतंत्रपणे वनस्पतींवरील संशोधनास सुरुवात केली.

या प्रयोगशाळेला त्यांनी विवेकानंद लॅबोरेटरी असे नाव दिले होते. बारा वर्षांनी ही प्रयोगशाळा त्यावेळच्या उत्तरप्रदेशातील कुमाऊँ पर्वतरांगांतील अलमोरा (अल्मोड़ा) या जिल्ह्याच्या ठिकाणी ‘विवेकानंद पर्वतीय कृषी संशोधन संस्था’ (Vivekananda Parvatiya Krishi Anusandhan Sansthan) या नावाने स्थलांतरित झाली. पुढे दशकभरात या संस्थेत वनस्पती संशोधनाची व्याप्ती वाढवण्यात आली.

विस्तारत गेलेली ही संस्था १९६०च्या दशकात प्रथम राज्य सरकारकडे वर्ग झाली व १९७४मध्ये भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या अखत्यारीत आली. कृषीविषयक प्रात्यक्षिके आणि प्रयोगांसाठी अलमोरापासून १३ किलोमीटरवर ८५ हेक्टर जमीन उपलब्ध करून देण्यात आली.

पर्वतीय प्रदेशातील पिकांसंदर्भात नैसर्गिक स्रोतांचा अभ्यास करत, पायाभूत आणि उपयोजित शास्त्रीय संशोधन साध्य करणे तसेच उत्पादनपश्‍चात प्रक्रियांचा विकास करणे; विकसित तंत्रविज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करत कुशल मनुष्यबळ निर्माण करणे असे उद्देश या संस्थेने समोर ठेवले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com