डॉ. अनुराधा उपाध्ये
देवरायांच्या निमित्ताने स्थानिकांनी राखलेली वने जैवविविधतेने समृद्ध आणि पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेली नंदनवने आहेत. ही वने पूर्वापार परिसंसंस्थेला आधार देण्याचे काम करीत आलेली आहेत. परंतु आता आधुनिकीकरण, संसाधनांचा वाढता व्यापार, वनांतील मंदिरांचे नूतनीकरण अशा अनेक कारणांमुळे देवरायांचे आणि तेथील जैवविविधतेचे नुकसान होत आहे. सुजाण स्थानिकांनी, पर्यावरणप्रेमींनी आणि संशोधकांनी हे धोके ओळखून विविध प्रयत्नांनी या देवराया वाचविण्याचे, त्यांचे पुनरुज्जीवन करण्याचे प्रयत्न केले आहेत, करीत आहेत.