नेहा लिमये
अतीव घुसमट सहन करून त्यातून ‘ब्रेक-फ्री’ होणं सोपं नसतं. त्यासाठी प्रस्थापित रचनेशी, स्वतःशी कडवा संघर्ष करावा लागतो. बंडखोर असण्याची, त्यानुसार वागायची, कहीतरी करण्याची मोठी किंमत जग तुमच्याकडून वसूल करत असतं. ती देऊन स्वतःची ओळख निर्माण करणं आणि त्या प्रवासात आपण कोण आहोत, का आहोत आणि कुठे जायचं आहे या प्रश्नांची उत्तरं शोधणं यावरच रॉक संगीताचा बुरूज उभा आहे.
Rock on! है ये वक़्त का इशारा
Rock on! हर लम्हा पुकारा
Rock on! यूँ ही देखता है क्या तू?
Rock on! ज़िंदगी मिलेगी ना दोबारा...