डॉ. सदानंद मोरे
चर्चिलला रशियाकडून काही अपेक्षा होत्या. रशियासह युरोपीय राष्ट्रांचा एक समूह औपचारिक वैधानिक पद्धतीने अस्तित्वात आला तर अमेरिकेची उपेक्षा करून आपल्याला जे साधायचे होते ते साधता येईल हा त्याचा विचार तर असणारच. पण अशा युरोपीय संघातील अग्रेसरच स्वाभाविकपणे आपल्याकडे म्हणजे इंग्लंडकडे येईल, असा त्याचा होरा असणार. पण प्रत्यक्षात मात्र रशियानेच त्याच्या या योजनेला सुरुंग लावला.
आचार्य रजनीश ओशो प्रवचनातून आपला सिद्धांत प्रतिपादन करताना नेहमी मनोरंजक गोष्टी दृष्टांतादाखल सांगत असत. त्याचा एक फायदा म्हणजे त्यांचे प्रतिपादन कंटाळवाणे होत नसे आणि दुसरा फायदा म्हणजे श्रोत्यांना प्रतिपाद्य मुद्दा समजायला मदतही होत असे.
एखादी माणसे किती आत्मकेंद्रित होऊन विचार करीत असतात हा त्यांचा मुद्दा होता. ग्रीक देशातील सोफिस्ट तत्त्ववेत्त्यांनी मानवाला केंद्रस्थानी ठेवून काहीएक मांडणी केली. मात्र, त्यांना मानवी व्यक्ती अभिप्रेत नसून मानवजात अभिप्रेत होती. (सॉक्रेटिससारख्या विचारवंताला तर तेही पटत नसल्याने त्याने मानवी विचार व्यवहारात काहीएक वस्तुनिष्ठता आणण्याचा प्रयत्न केला; पण तो आपल्या प्रस्तुत चर्चेचा विषय नाही.)