

Roosevelt vs Wilson
esakal
प्रत्येक राष्ट्राने व तेथील प्रजेने आपापल्या स्वयंनिर्णयाच्या अधिकाराचा उपभोग घ्यावा, असे तत्त्वज्ञान अमेरिकेने भले पुरस्कृत केले असेल; पण आपल्या अधिकारांवर, प्रभुत्वावर कोणी अतिक्रमण करू नये यासाठी आपण प्रसंगी बलप्रयोग करण्यात व तशी भूमिका घेण्यात मागे पडता कामा नये, असे अमेरिकेच्या धुरीणांना वाटणे स्वाभाविक होते. त्याची पहिली चुणूक मन्रो सिद्धांतातून पाहायला मिळाली.