Tyagaraja Krithi songs
esakal
साप्ताहिक
Premium|South Indian devotional music: दाक्षिणात्य भक्तिसंगीत-‘कृति’ची सुरेल परंपरा
Carnatic Krithi compositions: शब्दांपेक्षा स्वरप्रधान असलेले ‘कृति’ संगीतात भक्तिभाव अधिक ठळक दिसतो. त्यामुळेच हे संगीत प्रकार सहजगुणगुणता येतो.
ज्युकबॉक्स
नेहा लिमये
सकाळची प्रसन्न वेळ... देवघरापाशी उदबत्तीचा रेंगाळणारा गंध... स्वयंपाकघरातून चहाचं आधण चढवल्याचे, भाजी फोडणीला घालण्याचे ओळखीचे आवाज... या सगळ्याच्या बॅकड्रॉपवर व्यंकटेश स्तोत्राची सुरेल, सुस्पष्ट, मंगल गुणगुण... जणू पारिजातकाचं झाड वाकवून कुणीतरी आपल्यावर नाजूक, कोवळ्या फुलांचा वर्षाव करतं आहे तशी!
कौसल्या सुप्रजा राम पूर्वासन्ध्या प्रवर्तते ।
उत्तिष्ठ नरशार्दूल कर्त्तव्यं दैवमाह्निकम् ।।

