Premium|Naorem Roshibina Devi : दिव्यांशीच्या दुखापतीनंतर संधी मिळाली; रोशिबिनाने वादावर पदकातून दिले उत्तर

Roshibina Devi Overcomes Selection Controversy : निवड चाचणीतील पराभव, ऐनवेळी मिळालेली संधी आणि निवड वादाची पार्श्वभूमी असतानाही रोशिबिनाने दबाव झुगारून आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक जिंकत आपली कामगिरी सिद्ध केली.
Roshibina Devi Overcomes Selection Controversy

Roshibina Devi Overcomes Selection Controversy

esakal

Updated on: 

किशोर पेटकर

स्पर्धेला जाण्यापूर्वी झालेली टीका, संबंधित वाद यांचा परिणाम रोशिबिनाने प्रत्यक्ष कामगिरीवर होऊ दिला नाही. निवड चाचणीतील पराभवानंतर तिला आशियाई क्रीडा स्पर्धेच्या तयारीसाठी पुरेसा वेळही मिळाला नव्हता, तरीही ती विचलित झाली नाही. तिने सारे लक्ष आपल्या कामगिरीवर एकाग्र केले आणि अनुभवाच्या बळावर संस्मरणीय असे रौप्यपदक जिंकले.

जपानमधील आइची-नागोया येथील आशियाई क्रीडा स्पर्धा भारताच्या नाओरेम रोशिबिना देवी हिच्यासाठी अनपेक्षित आणि स्वप्नवत ठरली. स्पर्धा सुरू होण्यास सुमारे आठ दिवसांचा कालावधी असताना ही अनुभवी महिला वुशू खेळाडू सहभागाबाबत अनभिज्ञ होती. निवड चाचणीतील अपयशामुळे ती भारतीय पथकापासून दूरच होती, पण देशासाठी पदक जिंकण्याचा तिचा संकल्प कायम होता.

यावर्षी जूनमध्ये झालेल्या आशियाई स्पर्धा निवड चाचणीत राजस्थानची दिव्यांशी चौधरी रोशिबिनाला वरचढ ठरली होती. त्यामुळे सलग तिसऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पदक जिंकण्याचे रोशिबिनाचे स्वप्न धुसर झाले होते. मात्र स्पर्धा तोंडावर असताना दिव्यांशीला दुखापतीचा जबर धक्का सहन करावा लागला, जो तिच्यासाठी कठोर मानसिक आघात ठरला. स्वतःचे म्हणणे तिने रडत सर्वांसमोर व्हिडिओद्वारे मांडताना रोशिबिनावरही मानसिक छळाचा आरोप केला. आपण खेळू शकते हा दिव्यांशीचा दावा होता. दिव्यांशीने भारतीय वुशू महासंघाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या वाद प्रकरणी केंद्रीय युवक व्यवहार व क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी हस्तक्षेप केल्यानंतर दिव्यांशी शांत झाली.  दिव्यांशी आशियाई स्पर्धेतील सहभागाची स्वप्ने पाहत होती. तिला भारतीय संघाची जर्सीही मिळाली होती, मात्र खांद्याची दुखापत आणि तंदुरुस्तीचे कारण देत तिला वगळण्यात आले आणि रोशिबिनाला ऐनवेळी आशियाई स्पर्धेसाठी जाणाऱ्या विमानात जागा मिळाली. दिव्यांशीने त्रागा केला, पण आपणास मिळालेली संघातील जागा चुकीची नव्हती, ती गुणवत्तेवर आधारीत होती हे मणिपूरच्या जिगरबाज खेळाडूने जपानमध्ये सिद्ध केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com