प्रबोधनाचे ‘उत्तर’पर्व। डॉ. राहुल हांडे
गुरुभक्तीला सर्वोच्च स्थान देणाऱ्या, प्रेम व समर्पणातून भक्तीची ज्योत प्रज्वलित करणाऱ्या, निर्गुण-सगुण यांच्यातील भेद रेषा नष्ट करत सामंजस्य स्थापन करणाऱ्या सहजोबाईंचे जीवन उत्तर भारतीय भक्ती आंदोलनातील एक सोनेरी पान आहे. त्यांच्या कर्तृत्वाची दखल घेतल्याशिवाय उत्तर भारतीय भक्ती आंदोलनाचा इतिहास पूर्णत्वास जाऊ शकत नाही. प्रेमवेड्या मीरेच्या एक पाऊल पुढे जाऊन प्रेमाच्या महत्तेवर गाढ विश्वास असणारी सहजभक्तीची योगिनी सहजो त्यांच्या काव्यातून समजून घेणे महत्त्वाचे ठरते.
हरि प्रसाद की सुता, नाम सहजो है बाई।
दुसर कुल में जन्म, सदा गुरु चरण सहाई।।
चरणदास गुरुदेव, भेव मोहिं अगम बतायो।
योग युक्ति सूं दुर्लभ करि दीप दिखायो।।