
डॉ. श्रीनाथ कवडे
सह्याद्रीच्या निसर्गाला जागतिक स्तरावर अनन्यसाधारण महत्त्व आहे. जगातील ३४ अतिसंवेदनशील भूप्रदेशांमध्ये सह्याद्रीचा समावेश असून, युनेस्कोने या परिसरातील ३९ ठिकाणांना जागतिक नैसर्गिक वारसास्थळाचा दर्जा दिला आहे. ही पर्वतरांग गुजरातमधील डांग पट्ट्यापासून, म्हणजेच तापी नदीलगतच्या पूर्णा अभयारण्यापासून ते दक्षिणेकडील कन्याकुमारीपर्यंत पसरलेली आहे.