टीम पेटोपिया
प्रेम फक्त माणसांवर केलं जात नाही. ते मानवी नजरांच्या पलीकडेही उमगतं. माणसाच्या आणि पाळीव प्राण्यांच्या नात्यातून प्रकट होतं. शब्दांविना बोलणाऱ्या नात्यांची, जबाबदारीने फुलणाऱ्या प्रेमाची आणि सुजाण पालकत्वाबरोबरच अबोल जाणिवांची संवेदना असणाऱ्या ‘सकाळ पेटोपिया’ उपक्रमाबद्दल..
आपण दररोज अनेकांशी बोलतो. घरच्यांशी, मित्रांशी, ओळखीच्या माणसांशी. एखाद्या दुपारी कोणी जुना किस्सा सांगतं आणि आपण खळखळून हसतो. तर कधी असंच सहज बोलता बोलता, नकळत डोळ्यांच्या कडा ओलावतात. संवादाचा हा प्रवास शब्दांतून चालतो... भाषेच्या पायवाटेने...! पण... कधी असा क्षण येतो, जेव्हा शब्द थांबतात. तिथं केवळ नजर उरते आणि त्या नजरेतून, देहबोलीतून जे व्यक्त होतं, ते कुठल्याही भाषेपेक्षा अधिक खोलवर भिडतं.