Premium|Sanchi Buddhist Monuments UNESCO Site : सांचीचे बौद्ध स्मारक: प्राचीन वास्तुकलेचा अनमोल ठेवा

Ancient Indian Stupas and Mughal Architecture : सम्राट अशोकाच्या काळातील सांची येथील शांततामयी बौद्ध स्तूपांचा वारसा आणि दिल्लीतील मुघल स्थापत्यशैलीचा पहिला अविष्कार असलेला हुमायूनचा मकबरा भारतीय इतिहासातील विविध कालखंडांचे आणि सांस्कृतिक वैविध्याचे दर्शन घडवणारा एक महत्त्वाचा ऐतिहासिक दस्ताऐवज ठरतो.
Sanchi Buddhist Monuments UNESCO Site

Sanchi Buddhist Monuments UNESCO Site

esakal

Updated on

सांची बौद्ध स्मारकसमूह

  • जवळचे शहर : भोपाळ

  • जवळचे विमानतळ : राजा भोज विमानतळ, भोपाळ

  • जवळचे रेल्वेस्थानक : सांची

  • केव्हा जाल? : नोव्हेंबर ते फेब्रुवारी

वारसास्थळाची वैशिष्ट्ये : भोपाळपासून ४७ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या सांची शहरात विंध्याचल टेकडीवरील पठारावर ह्या प्राचीन बौद्ध स्मारकांचे अवशेष आहेत. ही स्मारके प्राचीन मूर्तीविरहित आणि मुक्तशैलीतील वास्तुकलेचे सर्वात जुने आणि प्रगल्भ नमुने आहेत. हा स्मारकसमूह इ.स.पूर्व तिसऱ्या शतकापासून ते इ.स. बाराव्या शतकापर्यंतच्या बौद्ध धर्माच्या इतिहासाचे व्यापक दस्तावेजीकरण करतो. सांचीला धार्मिक केंद्र म्हणून विकसित करण्याचे श्रेय सम्राट अशोकाला जाते. येथे तीन बौद्घ स्तूप असून त्यांतील महास्तूपाची मूळ वास्तू सम्राट अशोकाने बांधली. त्यात गौतम बुद्धाच्या अस्थींचे अवशेष असावेत, अशी एक वदंता आहे. इथेच सम्राट अशोकाने जगप्रसिद्ध असा एकाश्म ‘अशोक स्तंभ’ बांधला. सम्राट अशोकानंतर साधारण शंभर वर्षांनी शुंग राजवंशाच्या काळात स्तूपाचा आकार वाढविण्यात आला आणि त्यावर शुंग राजांनी सुंदर कठडे व दगडी तोरणे बांधली. महास्तूपानंतर उर्वरित दोन स्तूप नंतरच्या राजांनी बांधले. तसेच काही विहार, चैत्यगृहे आणि मंदिरेदेखील बांधली. सांचीचे वैशिष्ट्य म्हणजे येथील मूर्तिकामात भगवान बुद्धाची मूर्ती कुठेच आढळत नाही. मात्र धम्मचक्र, रिकामे सिंहासन, बुद्घ पादुका अशा सांकेतिक प्रतिकांतून भगवान बुद्धाचे अस्तित्व व्यक्त करण्याचा आविष्कार शिल्पकारांनी केला आहे. याशिवाय बोधिवृक्षाखाली सम्राट अशोक आणि परिवार, भगवान बुद्घाचे महाभिनिष्क्रमण, कश्यप ऋषींची कथा, कमलवनातील लक्ष्मी, सम्राट अशोकाची रामग्रामची यात्रा, छदंत जातकातील कथा, हत्तींनी केलेली बोधिवृक्षाची पूजा, भगवान बुद्धाच्या अस्थींसाठी चाललेला त्यांच्या अनुयायांतील झगडा, महाकपि अशी अनेक सुंदर शिल्पे सांचीमध्ये कोरली गेली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com