

Sant Namdev
esakal
नामदेवांचे वडील दामाशेटी विठ्ठलभक्ती करून, पंढरपूरची दरवर्षीची वारी सांभाळून आपला व्यापार वाढविण्यासाठीसुद्धा सातत्याने धडपडत असत. आणि हाच व्यवसाय, आपली विठ्ठलभक्ती, पंढरीची वारी सांभाळून नामदेवांनीसुद्धा करावा ही माफक अपेक्षा दामाशेटी आणि गोणाई यांची होती; पण नामदेव मात्र वेगळे होते. त्यांना संसारापेक्षा विठ्ठलभक्ती अधिक प्रिय होती. विठ्ठलासाठी ते वेडे झाले होते. त्याच्या भक्तीपुढे त्यांना सगळेच निरर्थक वाटत होते.