

Women Saree Entrepreneurs
esakal
साडी... भारतीय महिलांच्या अगदी जिव्हाळ्याचा विषय. साडी हा त्यांचा पारंपरिक पेहराव. प्रत्येक प्रांतात साडीचे रूप वेगळे असले, तरी सहा मीटरचे हे लांबलचक वस्त्र म्हणजे स्त्रीची अस्मिताच जणू... अशी ही साडी आज अनेक महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाचे साधन ठरली आहे. अनेकांचे संसार तिने उभे केले आहेत. अनेकींना तिने जगायला शिकवले आहे. साड्यांवरच्या प्रेमाखातर कोणी हा व्यवसाय करत आहे, तर कोणी आर्थिक गरज म्हणून; पण अशा अनेकींसह साडीप्रेमी महिलांना घट्ट बांधून ठेवले आहे ते साडीने. अशा काही व्यावसायिक महिलांशी साधलेल्या संवादातून उलगडलेले या व्यवसायातील ताणेबाणे...