

Saree in Indian film industry
esakal
भारतीय चित्रपटसृष्टीत फॅशनच्या हजारो लाटा उसळल्या. वेस्टर्न कपडे, ग्लॅमरस गाउन्स आणि स्टायलिश फ्युजन ड्रेसेस यांचा प्रचंड भडिमार झाला. पण यांच्यातही साडी मात्र आपल्या वेगळ्याच थाटात अगदी सन्मानानं उभी राहिली. उलट साडीनं तर पारंपरिकतेसोबत आधुनिकतेचा संगम साधत नवं रूप धारण केलं.
भारत म्हणजे विविध प्रकारचे रंग, धागे आणि कलात्मकतेचा एक जिवंत पटच जणू! इथे प्रत्येक राज्य, प्रत्येक प्रांत आपल्या वेगवेगळ्या वस्त्रपरंपरेसाठी ओळखला जातो. आणि या संस्कृतीचे सर्वात सुंदर प्रतीक म्हणजे साडी... स्त्रीच्या सौंदर्यावर साज चढवणारे वस्त्र! या वस्त्रात केवळ सौंदर्यच नव्हे, तर पिढ्यान््पिढ्यांची कहाणी विणलेली आहे. आईच्या पदरातला गंध, आजीच्या साडीतली ऊब, नववधूची उत्सुकता असं सगळं काही या साडीत दडलेलं आहे. साडी म्हणजे केवळ सांस्कृतिकच नव्हे, तर एक भावनिक वारसा आहे.