Premium|Smoking and Respiratory Health : तंबाखूमुक्त समाजाची गरज; सेकंड हँड स्मोकमुळे महिलां-मुलांमध्ये कर्करोग, दमा व अर्भक मृत्यूचा वाढता धोका

Smoking Health Risks : सिगारेट ओढणाऱ्याबरोबरच त्याच्या आसपासच्या व्यक्तींनाही धुराचा गंभीर धोका असतो. हवेत रेंगाळणारा हा धूर श्वसनसंस्थेवर परिणाम करून संसर्गापासून कर्करोगापर्यंत धोके वाढवू शकतो.
Smoking and Respiratory Health

Smoking and Respiratory Health

esakal

Updated on

डॉ. निरज जाधव

सिगारेटच्या धुरामुळे सिगारेट ओढणाऱ्याचे जितके नुकसान होत असते, तितकेच नुकसान बाजूला उभे राहून श्वासोच्छ्वास करणाऱ्याचेही होत असते. हा धूर अनेक तास हवेत रेंगाळतो. त्यामुळे केवळ एका खोलीमध्ये किंवा खिडकी उघडी ठेवून धूम्रपान केल्याने इतर लोकांना सुरक्षित ठेवता येत नाही.

शरीरक्रिया उत्तमरित्या चालावी यासाठी ऑक्सिजन, पाणी आणि अन्न या घटकांची प्रामुख्याने गरज असते. मानवी जीवनाच्या रक्षणासाठी या घटकांचे महत्त्वदेखील याच क्रमाने आहे. व्यक्ती काही दिवस अन्नाविना जगू शकते, पाण्याशिवायही काही काळ तग धरू शकते, परंतु शुद्ध हवेचा पुरवठा न झाल्यास अगदी काही क्षणांतच माणसाचा मृत्यू होऊ शकतो.

आयुर्वेदामध्ये श्‍वसनसंस्थेला ‘प्राणवह स्रोतस’ असे संबोधले जाते. प्राणवायूचे वहन करणारा मार्ग म्हणजे प्राणवह स्रोतस. प्राणरक्षणासाठी अतिशय महत्त्वाचा घटक असणारी हवा जर घातक रसायनांनी प्रदूषित झाली तर काय होऊ शकते, याचे उत्तर श्‍वसनसंस्थेला होणाऱ्या संसर्गापासून सुरू होऊन ते कर्करोगापर्यंत जाऊन थांबते. सिगारेट, बिडी ओढणे शरीरासाठी घातक आहे, हे आपण जाणतो. किंबहुना कायद्यानेदेखील तशा पद्धतीची तरतूद करून या उत्पादनांच्या वेष्टनावर ही सर्व उत्पादने प्राणघातक असल्याची सूचना छापणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे सिगारेट, बिडी तसेच इतर तंबाखूजन्य उत्पादनांपासून शक्य तितके दूर राहिलेलेच बरे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com