Premium|Parenting: पालक म्‍हणून मी फिट आहे का?

Parent Fitness: स्वतःकडे दुर्लक्ष करून मुलांसाठी आयुष्यभर खस्ता काढणं म्हणजे पालकत्व नाही
PArenting fitness

PArenting fitness

Esakal

Updated on

डॉ. प्रमोद जोग

‘पालक’ ही एक पदवी आहे. ती मिळवण्यासाठी शरीराचं पोषण, मनाची जडणघडण, बुद्धीचं विकसन, मूल्यांचं रोपण आणि स्वतःचं आचरण असे पाच पेपर द्यावे लागतात. बाळाच्या आगमनापूर्वीच परीक्षेची तयारी सुरू करावी लागते. आयुष्यभर परीक्षा सुरूच असते. अगदी मुलं मोठी झाली तरी.

मुलं जसजशी वयानं मोठी व्हायला लागतात तसतसं पालकांचंही वय वाढत असतं, हे विसरून चालणार नाही. मुलं वयात येतात तेव्हा बहुतेक पालकांनी चाळिशी ओलांडलेली असते. अशा वेळी पालक ‘फिट’ - सुदृढ असणं फार महत्त्वाचं आहे. स्वतःकडे दुर्लक्ष करून मुलांसाठी आयुष्यभर खस्ता काढणं म्हणजे पालकत्व नाही. स्वतः फिट राहून त्यांना वाढवणंही तेवढंच महत्त्वाचं आहे. मुलांना तंदुरुस्त ठेवण्याच्या नादात पालक स्वतःकडे दुर्लक्ष करतात आणि वाढीच्या वयात मुलांच्या वाट्याला येतात अनफिट पालक!

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com