Shankarpali
Esakal
उषा लोकरे
दिवाळीच्या फराळातील खुसखुशीत शंकरपाळी सर्वांना आवडतात. जिभेवर टाकताच विरघळणारी शंकरपाळी समोर आली की ती नक्कीच लक्षात राहतात. प्रमाण व्यवस्थित असेल तर हमखास हवी तशी खुसखुशीत शंकरपाळी तयार होतात. सध्या डाएट आणि पौष्टिक आहाराच्या ट्रेंडनुसार गूळ वापरून, बेक किंवा एअर फ्रायर करूनही शंकरपाळी करता येतात. फ्यूजन फूड म्हणून केली जाणारी चीज शंकरपाळी मुलांना पसंत पडताहेत. तरी पारंपरिक शंकरपाळीचा स्वाद लोकप्रिय आहेच.
साहित्य
सव्वा वाटी मैदा, ५० ग्रॅम किसलेले चीज, २ टेबलस्पून वितळलेले साजूक तूप, मीठ, १ चमचा मिरी पूड, रिफाइंड तेल.