Premium|Sherlock Holmes: प्रिय आर्थर..! गुप्तहेरांच्या जगात शेरलॉक होम्सची जादू १३८ वर्षांनंतर आजही कायम

Sir Arthur Conan Doyle: जरा तुझे ब्रिटिश एटिकेट्स, तेही १८००च्या काळातले, बाजूला ठेवशील का तुझ्या या फॅनसाठी? कारण मी तुला एकविसाव्या शतकातून पत्र लिहितेय; २०२५मधून!
Sherlock Holmes

Sherlock Holmes

Esakal

Updated on

इरावती बारसोडे

किशोरवयीन फास्टर फेणे असो किंवा आजीबाई असलेली मिस मार्पल... किंवा शेरलॉक, पायरो, व्योमकेश, फेलूदा, झुंजार, धनंजय... या साऱ्यांनी मनोरंजनाची आगळीच कवाडं खुली केली. आभार प्रदर्शन केल्यासारखं वाटेल, पण खरंच या साऱ्यांचे आम्ही सारे वाचक जन्मभर ऋणी राहणार हे नक्की!

प्रिय आर्थर,

तुला ‘सर’ न म्हणता ‘प्रिय आर्थर’ म्हटलेलं चालेल का? आणि मुख्य म्हणजे अरे-तुरे केलेलं चालेल का? चालवून घेच आता. जरा तुझे ब्रिटिश एटिकेट्स, तेही १८००च्या काळातले, बाजूला ठेवशील का तुझ्या या फॅनसाठी? कारण मी तुला एकविसाव्या शतकातून पत्र लिहितेय; २०२५मधून!

मी जवळपास १०० वर्षं आधी जन्माला आले असते ना, तर मी स्ट्रँड मॅगझीन नक्की विकत घेऊन वाचलं असतं. स्ट्रँडमधूनच ‘शेरलॉक होम्स’चं वेड लावलंस ना तू लोकांना? इतकं की तुला थांबायची इच्छा असूनसुद्धा शेरलॉकच्या चाहत्यांनी तुला थांबू दिलं नाही. तुला इतर गोष्टींकडे लक्ष द्यायचं होतं, म्हणून १८९३मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘द फायनल प्रॉब्लेम’मधून तू शेरलॉकला अलविदा केलंस. स्वित्झर्लंडच्या रायकनबाक फॉलमध्ये मिस्टर होम्स आणि त्याचा शत्रू मोरिआर्टी या दोघांनाही जलसमाधी दिलीस. शेरलॉक काल्पनिक होता, तरी लोकांना आपल्या घरातलंच कोणीतरी गेल्यासारखं वाटलं. अगदी तुमच्या ब्रिटिश राजघराण्यालाही हे सहन झालं नाही, असं माझ्या वाचनात आलंय. ज्या स्ट्रँड मॅगझीनमधून शेरलॉक त्याच्या चाहत्यांना भेटायला यायचा, त्याचा खप वीसेक हजारांनी कमी झाला. म्हणून मग स्ट्रँडवालेसुद्धा तुझ्या मागे लागले का रे, शेरलॉकला परत आणण्यासाठी? वाचकांनी तर शेरलॉकच्या मृत्यूचा निषेधच केला असणार. शेरलॉक काल्पनिक होता त्यामुळे तू त्याला परत आणू शकलास. ‘द अॅडव्हेंचर ऑफ द एम्प्टी हाऊस’मधून शेरलॉक परत आला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com