

Resort Mental Reset
esakal
रोजच्या धावपळीत मन कुठेतरी थकून जातं आणि मग एखाद्या शांत ठिकाणी पळ काढावासा वाटतो. काहीजणांसाठी हा आरामासाठीचा ब्रेक असतो, काहींसाठी सेलिब्रेशनचा, तर काहींसाठी स्वतःला नव्यानं शोधण्याचा. म्हणूनच लोक शहराच्या गोंगाटातून बाहेर पडून रिसॉर्टकडे धाव घेतात. कारण तिथं मिळणारं शांत वातावरण, निवांत सकाळ, वेगवेगळे अनुभव आणि निसर्गाचा स्पर्श हे सगळं मनाला अगदी हळूच रीसेट करून जातं.
सगळं काही नीट चाललं असलं, तरी कधीतरी अचानक आतून गुदमरल्यासारखं होतं. रोजचं रहाटगाडं नकोनकोसं वाटू लागतं. मग आपलं मनच आपल्याला सांगू लागतं... कुठेतरी निवांत कॉफीचा घोट घेत सकाळ नुसती बघ कधीतरी... कधीतरी समुद्राजवळ बसून त्याच्या लाटांची गाज ऐक... शांतता अनुभव... जरा स्वतःशीच बोल... मन असं म्हणू लागलं की त्याचं ऐकावं आणि निघावं गोगांटापासून दूर. बॅग पॅक करावी आणि जावं एखाद्या शांत ठिकाणी असलेल्या रिसॉर्टला.