वैष्णवी कारंजकर-इंगळे
अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवानिमित्त आता बाजारपेठ सजली असून सराफांकडेही वैविध्यपूर्ण वस्तू दाखल झाल्या आहेत. चौदा विद्या आणि चौसष्ठ कलांचा अधिपती असलेल्या गणरायासाठी भक्तांनी कौशल्य पणाला लावून तयारी केल्याचं दिसून येतंय.