आरोग्य। डॉ. प्रशांत मुंडे
स्लिप डिस्क आणि सायटिका या मणक्यांशी संबंधित त्रासदायक समस्या असून यांमुळे पाठीच्या खालच्या भागात वेदना व हालचालींमध्ये अडथळा निर्माण होतो. तपासणी, योग्य औषधोपचार, फिजिओथेरपी आणि आवश्यकतेनुसार शस्त्रक्रियेच्या मदतीने रुग्ण पूर्णपणे बरा होऊ शकतो.
डिस्कची संरचना (Anatomy of Intervertebral Disc)
आपल्या दोन मणक्यांच्या मधे असलेल्या मऊ, जेलसारख्या उशा म्हणजे ‘इंटरव्हर्टिब्रल डिस्क’. ही डिस्क दोन हाडांच्या मणक्यांमध्ये असते आणि हाडांना बसणारा धक्का शोषून घेण्याचे काम करते. डिस्कमध्ये दोन भाग असतात, पहिला म्हणजे बाह्य कठीण भाग (Annulus Fibrosus) आणि दुसरा आतील मऊ, जेलसारखा भाग (Nucleus Pulposus). या डिस्कमुळे मणक्यांमध्ये लवचिकता राहते.
स्लिप डिस्क म्हणजे काय?