Premium|Museum visit guide : संग्रहालयांची सफर आता डिजिटल; क्यूआर कोड स्कॅन करा आणि मिळवा अनमोल वस्तूंची इत्थंभूत माहिती

Museum Technology Trends : संग्रहालयांना भेट देताना तंत्रज्ञानाचा वापर आणि पूर्वतयारी महत्त्वाची ठरते. राजा दिनकर केळकर म्युझियमसारख्या ठिकाणी डिजिटल ऑडिओ गाईड्स उपलब्ध असून, इंटरनेटच्या मदतीने इतिहास जाणून घेतल्यास ही सहल अधिक रंजक आणि माहितीपूर्ण होऊ शकते.
Museum Technology Trends

Museum Technology Trends

esakal

Updated on

सुधन्वा रानडे

संग्रहालयामध्ये प्रवेश केल्यानंतर तिथं काही टेक्नॉलॉजिकल गॅजेट्स उपलब्ध आहेत का, ते पाहावं. उदाहरणार्थ, ऑडिओ गाइड्स, टच स्क्रीन डिस्प्लेज. राजा दिनकर केळकर म्युझियममध्ये पर्सिस्टंट इंडिया फाउंडेशनच्या मदतीनं मल्टी-लिंग्वल स्मार्ट डिजिटल ऑडिओ गाइड ही सेवा सुरू केली आहे. यामुळे मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा तीन भाषांमध्ये तिथं माहिती मिळू शकते. फक्त क्यूआर कोड स्कॅन करून संपूर्ण संग्रहालयाची इत्थंभूत माहिती मिळते.

म्युझियम पाहायला जाताना अभ्यास करून जाणं नक्कीच आवश्‍यक असतं. तिथं काय वस्तू आहेत, त्यांचा साधारण इतिहास काय आहे हे सर्व तिथं जाण्याआधी जाणून घेणं महत्त्वाचं ठरतं. तुम्ही जे संग्रहालय निवडलं आहे, त्याची पूर्वपीठिका अर्थातच जाणून घ्यायला हवी. त्यासाठी सोशल मीडिया, इंटरनेटसारख्या विविध माध्यमांची मदत घेता येऊ शकते. संग्रहालयाविषयीचा जो काही तपशील उपलब्ध आहे, त्याची माहिती करून घेऊनच मगच संग्रहालय पाहायला जावं. कारण जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष एखाद्या विशिष्ट संग्रहालयाला भेट देता, तेव्हा ते संग्रहालय कसं उभं राहिलं असेल? त्या संग्रहालयाची पूर्वपीठिका काय आहे? तिथं कुठल्या वस्तूंचा संग्रह केलेला आहे? त्या संग्रहाचं नेमकं वैशिष्ट्य काय आहे? हे सगळे प्रश्‍न तुम्हाला हमखास पडणार असतात, म्हणूनच ही सगळी माहिती घेऊनच संग्रहालयाला भेट द्यावी.

Museum Technology Trends
Premium|Artificial intelligence: नवतंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सर्जनशीलतेची गरज
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com