
Sorghum Snacks
Sakal
अलकनंदा कोठावदे
साहित्य
दोन वाट्या ज्वारीचे पीठ, १ वाटी कणीक, १ वाटी बारीक चिरलेला गूळ, मोहनासाठी व तळण्यासाठी तेल.
कृती
सर्वप्रथम गूळ पाण्यात भिजवून ठेवावा. मग एका ताटात ज्वारीचे पीठ व कणीक घेऊन त्यात थोडे तेलाचे मोहन घालावे. नंतर गुळाच्या पाण्याने पीठ मळून घ्यावे. पोळीच्या पिठासारखे मिश्रण करून १० ते १५ मिनिटे झाकून ठेवावे. त्यानंतर छोटे छोटे गोळे घेऊन पोळपाटावर मोठी पोळी लाटून वाटीच्या साहाय्याने लहान लहान पुऱ्या करून घ्याव्यात. नंतर कढईत तेल गरम करून पुऱ्या गुलाबी रंग येईपर्यंत तळून घ्याव्यात. गरमागरम पुऱ्या लोणच्यासोबत किंवा दह्यासोबत सर्व्ह कराव्यात.