Premium|Space Junk Challenges : अंतराळात ताशी २८,००० किमी वेगाने फिरतोय १३ कोटी तुकड्यांचा कचरा! एका छोट्या कणामुळे उपग्रह निकामी होऊ शकतात?

Future of space safety and navigation : अंतराळात १३ कोटींहून अधिक सूक्ष्म कणांचा कचरा ताशी २८ हजार किमी वेगाने फिरत असून, तो उपग्रहांसाठी गंभीर धोका ठरत आहे. अवकाश सुरक्षितता आणि भविष्यातील तांत्रिक स्वायत्ततेसमोर उभे राहिलेले हे एक मोठे जागतिक आव्हान आहे.
Future of space safety and navigation

Future of space safety and navigation

esakal

Updated on

हर्ष मुथा

एक ते दहा सेंटिमीटर आकाराचे सुमारे १२ लाख तुकडे आणि एक सेंटिमीटरपेक्षा लहान असलेले तब्बल १३ कोटींहून अधिक सूक्ष्म कण अंतराळात अस्तित्वात आहेत. हे सर्व तुकडे सुमारे २८ हजार किलोमीटर प्रतितास इतक्या प्रचंड वेगाने पृथ्वीभोवती फिरत असल्याने अगदी छोटा कणही कार्यरत उपग्रहांसाठी गंभीर धोका निर्माण करू शकतो. त्यामुळे अंतराळातील कचरा ही केवळ अदृश्य समस्या नसून, भविष्यातील अवकाश सुरक्षितता, तांत्रिक व्यवस्था आणि जागतिक स्थैर्यासाठी मोठे आव्हान ठरत आहे.

ता. २७ मार्च २०१९ हा भारताच्या अवकाश प्रवासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरला. मिशन शक्तीअंतर्गत भारताने अँटी-सॅटेलाइट (ए-सॅट) चाचणी यशस्वीपणे पूर्ण करत मायक्रोसॅट-आर या भारतीय उपग्रहाला सुमारे ३०० किलोमीटर उंचीवरील लो अर्थ ऑर्बिटमध्ये स्थापित केले. यामुळे अमेरिका, रशिया आणि चीननंतर अशी क्षमता प्रदर्शित करणारा भारत चौथा देश ठरला.

आज अमेरिका, युरोपीय देश, जपान आणि चीन यांसारख्या प्रमुख अवकाश शक्तींनी अत्याधुनिक तांत्रिक परिसंस्था उभारल्या आहेत. नासा, युरोपियन स्पेस एजन्सी यांसारख्या संस्थांबरोबरच स्पेसएक्ससारख्या खासगी कंपन्यांनी जलद प्रक्षेपण क्षमता, मजबूत पायाभूत सुविधा आणि डेटा-स्वावलंबन साध्य केले आहे. त्यांची नेव्हिगेशन प्रणाली आणि उपग्रह समूहांमधून तांत्रिक परिपक्वता आणि धोरणात्मक स्वायत्तता स्पष्ट दिसते.

या घटनेमुळे एक महत्त्वाचा प्रश्नही पुढे आला, तो म्हणजे अंतराळात वाढत चाललेल्या या उपग्रहांच्या कचऱ्याचे काय?

आज अंतराळ हा केवळ संशोधनाचा किंवा तांत्रिक प्रगतीचा विषय राहिलेला नाही; तो हळूहळू ‘गर्दीचा परिसर’ होत चालला आहे. अमेरिका, चीन, रशिया आणि युरोपीय देशांनी गेल्या काही दशकांत मोठ्या प्रमाणावर उपग्रह प्रक्षेपित केले आहेत. त्यात भर म्हणजे ए-सॅट चाचण्या. या चाचण्यांमुळे अंतराळात हजारो सूक्ष्म तुकडे निर्माण होतात. चीनच्या २००७च्या चाचणीनंतर आणि रशियाच्या २०२१मधील कारवाईनंतर ही समस्या अधिक गंभीर झाली आहे.

Future of space safety and navigation
Premium|India economy crisis : आखाती युद्धाची ठिणगी आणि भारताची होरपळ! कच्च्या तेलाचा भडका सामान्य माणसाच्या खिशावर कसा परिणाम करणार?
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com