प्रियांका सत्यवान
योगासनांचे शरीराला होणारे फायदे आपण सर्वजण जाणतोच. शरीराच्या लवचिकतेसाठी आणि मनाच्या शांतीसाठी आसने उपयुक्त ठरतात. स्त्रियांच्या आरोग्यासाठी काही ठरावीक आसने अधिक फायदेशीर असतात. विशेषतः मासिक पाळीदरम्यानच्या तक्रारी, हार्मोनल असमतोल अशा तक्रारींवर उपाय म्हणून, तसेच गर्भधारणेपूर्वी आणि नंतरच्या काळातही स्त्रियांना योगासनांचा फायदा होऊ शकतो. दैनंदिन जीवनात ही आसने करणे उपयुक्त ठरू शकते.