
किरण शिवहर डोंगरदिवे
माणसाच्या जगण्यात वसंत ऋतूच्या जाणिवा समृद्धपणे पेरल्या गेलेल्या असतात. राखेतून जसा फिनिक्स नवा जन्म घेतो त्याच पद्धतीने आपला पूर्ण पर्णसंभार गळून गेल्यावर कोवळ्या पानांसह, रंगीत पुष्प आणि मधुर फळांसह झाडाझुडपांतून जो सळसळत प्रसन्नतेनं उभा राहतो तो ऋतू म्हणजे वसंत होय.
वसंतोत्सव म्हणजे खऱ्या अर्थाने निसर्गाचा एक उत्सव. सर्वसामान्यपणे कोणत्याही ऋतूतील निसर्ग म्हणजे नितळ आणि निर्मळ सौंदर्याचा खजिना असतो. त्यातही ऋतूंचा राजा वसंत म्हटल्यावर त्याच्या सौंदर्यात राजेशाही थाट येणारच!