

Mental Health and Resilience
esakal
...म्हणूनच नेहमी हिलस्टेशन्सच्या सनराइझ पॉइंट्सवर, सूर्योदयाइतकीच गर्दी सूर्यास्त पाहायलाही असते. अस्ताला जाणारा सूर्यही आश्वासक असतो. त्याच्यात उद्याच्या उगवतीची आशा असते, पॉझिटिव्हिटी असते! अनुभवानं सांगतो, मनाची सकारात्मता, शारीरिक उपचारांनाही साथ देते. आणि तुझं तर नावच मानसी!...
‘अक्षर’ या छोट्यांसाठीच असणाऱ्या वाचनालयाच्या बैठ्या कौलारू वास्तूच्या बाहेरच्या प्रांगणात शनिवारी-रविवारी, सुट्ट्यांच्या दिवसांत मोठ्यांसाठी-मुलांसाठी विविध कार्यक्रम होतात. तिथल्या झाडांच्या विस्तीर्ण कट्ट्यावर बसून मुलांना गोष्टी सांगण्यासाठी, मनोरंजन करण्यासाठी खास पाहुणे येतात. पपेट-शोपासून, खगोलशास्त्रीय विषय समजावून सांगणाऱ्या ‘तारांगण’सारख्या कार्यक्रमांपर्यंत मुलांसाठी सर्वकाही तिथं सादर होतं! वर्षभरापूर्वी तिथं शनिवारी-रविवारी सकाळी मुलांसाठी चित्रकलेचे खास वर्ग आयोजित केले होते. शाळांतून आणि ऑनलाइन चित्रकला शिकवणारे नामवंत शिक्षक शिकवणार होते. मुलांना सोडायला लांबून येणाऱ्या आई-वडिलांसाठी, पालकांसाठी झाडांच्या सावलीत कट्ट्यावर बसून तिथलीच पुस्तकं-मासिकं वाचायची सोय होती.