Share Market: गाडी बुला रही है...!

Market Up and Down: शेअर बाजार कुठलेही कारण घेऊन खाली-वर होऊ शकतो. निर्देशांकाकडे न बघता शेअरचा इतिहास, व्यवस्थापन व मुलभूत कामगिरीकडे लक्ष दिल्यास अनेक संधी दिसतात
Share Market
Share Market Esakal
Updated on

भूषण महाजन

शेअर बाजार कुठलेही कारण घेऊन खाली-वर होऊ शकतो. निर्देशांकाकडे न बघता शेअरचा इतिहास, व्यवस्थापन व मूलभूत कामगिरीकडे लक्ष दिल्यास अनेक संधी दिसतात. त्या जरूर ताब्यात घ्याव्यात. बाजारातील ‘नॉईज’कडे लक्ष देऊ नये.

तज्ज्ञ मंडळी आता पुरे, आता पुरे असे म्हणत असताना २७ सप्टेंबर रोजी निफ्टीने अपेक्षेपलीकडे २६२२७चा उच्चांक नोंदवला होता. त्या दरम्यान लिहिलेल्या लेखात (वाजे पाऊल आपले, ता. १२ ऑक्टोबर) आता मंदीचे सर्व रसायन तयार आहे असे म्हटले होते.

पुढील सप्ताहातच एक डाव स्वप्नभंगाचा... (ता. १९ ऑक्टोबर) लिहिताना शेअर बाजार, पक्षी निफ्टी खाली का येऊ शकते ह्याची कारणमीमांसा केली होती.

२४८०० ह्या पातळीवर निफ्टी थांबली नाही, तर किमान हजार अंश खाली येऊ शकते असा अंदाज व्यक्त केला होता. त्यानंतर एखादी तरी स्मितरेषा (ता. ७ डिसेंबर) या लेखात निफ्टी २३५०० ह्या २०० दिवसांच्या चल सरासरीजवळ आधार घेऊन उसळेल असा अंदाज केला होता. पण शेअर बाजार आपले अंदाज नेहमीच खरे ठरवतो असे नाही. पण यावेळी तसे झालेले दिसते.

शेअर बाजाराने १०-११ टक्के माघारी फिरून पुन्हा आपली घोडदौड सुरू केली आहे. एनएसई ५०० तर २६ टक्के घसरला होता. आजही मूल्यांकन महागच आहे. पण निर्देशांकाकडे न बघता एकेका शेअरचा विचार केला, तर तेजीबरोबर मंदीतही चांगली संधी शोधता येते. असो.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com