अर्थविशेष । भूषण महाजन
आपल्याकडे रिफायनरींचे मार्जिन तेलाच्या किमतीवर अवलंबून असल्यामुळे ओएनजीसी, रिलायन्स, इंडियन ऑइल वगैरे शेअरचे भाव वधारतील. हा लेख प्रसिद्ध होईपर्यंत हे झालेले असेल. तसेच टायर, पेंट, विमान वाहतूक, खते या उद्योगांची प्रगती मंदावलेली असेल. बाहेरील चलनांच्या तुलनेत रुपया खाली येऊ शकतो; त्यातून आयात महाग होईल. पण स्वस्त रुपयाचा लाभ निर्यातमुख क्षेत्रांना होईल.
बाराची गाडी निघाली, चला आता उशीर करू नका असे आवाहन आम्ही गेल्या लेखात (ता. २१ जून) केले खरे, पण घराबाहेर निघताच गाडीचा शॉकॲब्जॉर्बर काम करेनासा व्हावा आणि प्रवासात धक्के बसायला एकच गाठ पडावी व शेवटी गाडी बाजूला घेऊन दुरुस्तीसाठी थांबावे लागावे तसेच काहीतरी झाले. (आमचा लेख नेहमीच एक सप्ताह आधी लिहिला जात असल्यामुळे, अनेकदा त्यातील ‘पंच’ फुसका ठरतो. १४ जूनला प्रसिद्ध झालेल्या २१ जूनच्या अंकातील लेख ७ जूनला लिहिला होता हे कृपया लक्षात घ्यावे.)