
अमोघ वैद्य
जुन्नरच्या डोंगरात भूत लेणीसमूह कातळातून प्राचीन कथा सांगण्यास उत्सुक वाट बघत उभा आहे. कातळात कोरलेली शिल्पं नाग, गरुड आणि कमळं तुम्हाला थांबायला लावतात. इथं काळ मंदावतो आणि जणू प्रत्येक दगडात हजारो वर्षांपूर्वीच्या कारागिरांचा स्पर्श जाणवतो. हा लेणीसमूह पाहताना तुम्ही फक्त दगड पाहत नाही, तर जिवंत इतिहासात पाऊल टाकता!
जुन्नरच्या खोऱ्यात, मानमोडी डोंगराच्या कातळात प्राचीन बौद्ध लेण्यांचा खजिना दडला आहे. या डोंगरात खोदलेल्या लेण्या इ.स.पू. पहिल्या शतकातला सातवाहन काळापासूनचा वारसा सांगतात. डोंगरकड्यांना लागून, हिरव्या झाडींमधून वाट काढत चालत गेलं, की काही मिनिटांतच कातळात कोरलेली ही प्राचीन दुनिया समोर येते. पण इथलं मोठं वेगळेपण म्हणजे ह्या लेण्याचं नाव - भूत लेणं...