अर्थविशेष । भूषण महाजन
दीर्घ मुदतीच्या गुंतवणूकदाराने घाबरायचे कारण नाही. आर्थिक वर्ष २०२५ ते आर्थिक वर्ष २०२७ यादरम्यान निफ्टीसाठी अपेक्षित उत्पन्न वाढ आता वार्षिक १२.७ टक्के आहे. पुढील तीन वर्षांचा उतारा त्यापेक्षा अधिकच यायला हवा. शेअरची चोखंदळ निवड आणि ते दीर्घकाळ सांभाळण्याची तयारी गुंतवणुकीतून पुरेसे समाधान देतील.
गेल्या सप्ताहातील लेखात (थोड़ा सा ठहरो...! ता. ३१ मे) आम्ही म्हटले होते, की ७ एप्रिल रोजी २१७४३चा तळ नोंदवल्यावर निफ्टी महिनाभरात २५०१९ अंशावर पोहोचली आहे. ह्या ३२७६ अंशाच्या घोडदौडीनंतर तिने चार पावले मागे यायला हवे, म्हणजे अधिक जोमात पुढील चाल रचता येईल. नेमका २३ मे रोजी संपलेला सप्ताह दिशाहीन होता. बातम्यांच्या तालावर वर-खाली होत आठवड्यात निफ्टी १७६ अंश खाली येऊन २४८५३ अंशावर बंद झाली. ह्या दरम्यान तिने २४४६२ अंशाचा खालचा भाव दाखवून शुक्रवारी आपण पुन्हा ताजेतवाने झाल्याचे दर्शवले. आता पुढे काय?