
राधिका परांजपे-खाडिलकर
डाएटशी झगडण्यात आणखी एक आठवडा सरला. ठरल्याप्रमाणं ती (तिच्या दृष्टीनं बेचव असलेलं) डाएट फूड खात होती. तिनं तिच्या ऑफिसमधल्या मैत्रिणींना डाएटविषयी सांगून ठेवलं होतं, ती कधी अरबट चरबट खाताना दिसली तर तिला ओरडण्याचा हक्कही तिनं त्यांना दिला होता. त्यामुळे ऑफिसमध्ये तरी तिचं जंक फूड खाणं बंद झालं होतं. पण तो आनंद फार काळ टिकला नाही.