
A World Without War
Sakal
माधव गोखले
पडद्याआड घडलेल्या काही घटना आणि आंतरराष्ट्रीय परिप्रेक्ष्यात विविध स्तरांवर घडणाऱ्या घटनांमधल्या अंतर्गत संबंधांच्या मांडणीतून वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय करारांवर टाकलेला दृष्टिक्षेप हे या पुस्तकाचे एक वेगळेपण. आपणहून अण्वस्त्रांचा वापर न करण्याच्या कराराविषयी भारत आणि चीन हे दोनच देश वगळता अन्य अण्वस्त्रधारी देशांनी पांघरलेली संदिग्धता, अमेरिका आणि रशिया यांची शस्त्रास्त्रे व सैन्यदलांच्या संदर्भातील अनेक करारांमधून बाहेर पडण्याची, स्वतःला वगळण्याची खेळी असे सहसा वाचनात न येणारे मुद्दे वासलेकर अधोरेखित करतात.