Takali Dhokeshwar caves

Takali Dhokeshwar caves

Esakal

Premium|Takali Dhokeshwar caves: सह्याद्रीच्या कुशीत लपलेलं टाकळी ढोकेश्वर लेणं; प्राचीन वारशातलं अध्यात्मिक सौंदर्य

Maharashtra caves: सह्याद्रीच्या आडवाटांवर, जंगलांच्या सावलीत आणि डोंगररांगांच्या घाटीत, अनेक उपेक्षित लेणी आजही भटक्यांची वाट पाहत आहेत..
Published on

लयनकथा । अमोघ वैद्य

टाकळी ढोकेश्‍वर लेण्याचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचं साधेपण आणि गूढता, जे पर्यटकांना डोंगराच्या हिरवाईमध्ये हरवायला भाग पाडतं. हे लेणं आपल्या प्राचीन सौंदर्यानं पर्यटकाला निसर्ग आणि अध्यात्माच्या मधुर मीलनाचा अनुभव देतं. तिथं मन शांततेत मग्न होतं. सह्याद्रीच्या कुशीत, काळाच्या कवेत जपलेलं हे लेणं पाहणाऱ्या प्रत्येकाला प्राचीन वारशाची ओळख करून देतं.

ब्राह्मी माहेश्वरी चैव कौमारी वैष्णवी तथा ।

वाराही च तथेन्द्राणी चामुण्डा सप्तमातरः ।।

महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेली अजिंठा, वेरूळ, कार्ले, भाजे, बेडसे यांसारखी लेणी पर्यटकांना खेचतात, पण सह्याद्रीच्या आडवाटांवर, जंगलांच्या सावलीत आणि डोंगररांगांच्या घाटीत, अनेक उपेक्षित लेणी आजही भटक्यांची वाट पाहत आहेत. ही लेणी जणू काळाच्या कवचात लपलेल्या प्राचीन कारागिरांचं कसब आणि श्रद्धेचा मूक संदेश सांगतात. आपण नेहमी गजबजलेल्या पर्यटनस्थळांना प्राधान्य देतो, पण ही अपरिचित लेणी, त्यांच्या शांत सौंदर्यानं आणि गूढ इतिहासानं मनाला एक वेगळ्या अनुभवाची पावसाळी भेट देतात. महाराष्ट्राच्या या लपलेल्या खजिन्यांना भेट देणं म्हणजे फक्त इतिहास पाहणं नाही, तर निसर्गाच्या कुशीत हरवून जाणं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com