Jellyfish
Esakal
श्रीनिवास शारंगपाणी
तारुण्याचा टप्पा झाल्यानंतर येणारा पुन्हा वार्धक्याचा टप्पा कमी कालावधीचा किंवा नाहीसा कसा करायचा, याचा विचार डॉक्टर करू लागले. त्यांनी टीडी जेलीफिशचा नव्यानं अभ्यास सुरू केला. आणि मग एकाएकी त्यांच्या लक्षात आलं की टीडीच्या जीवनचक्रामधला एक महत्त्वाचा भाग त्यांनी गडबडीत नीटसा अभ्यासलेला नव्हता.
हो डॉक्टरसाहेब, तीनदा हाका मारल्या मी. तुम्हाला जेवायला वाढू का नको? सगळं तयार आहे. तुम्ही नंतर बसणार असाल तर झाकून ठेवते. मग घ्या गरम करून गार झालं तर,’’ स्वयंपाकाच्या निर्मलाबाईंनी
डॉ. शशिशेखर यांना निर्वाणीचं सुनावलं.
‘‘आलो, आलो दोन मिनिटांत,’’ डॉक्टर उत्तरले.
‘‘तुमची दोन मिनिटं कधी संपायचीच नाहीत. सारखं तुम्ही त्या कॉम्प्युटरच्या समोर बसलेले असता, नाहीतर खालच्या प्रयोगशाळेत कसल्या कसल्या यंत्रात डोकावून पाहत असता. ते काही नाही. मी हा कॉम्प्युटर बंदच करते कसा,’’ असं म्हणून निर्मलाबाई पुढे सरसावल्या तशी त्यांना बाजूला करून शशिशेखर उठलेच.
‘‘हं, तुमचं जेवण झालं की ताट-वाटी त्या मशिनमध्ये टाका. संध्याकाळच्या स्वयंपाकाला मी आले की ती धुऊन घेईन. आणि जेवण झाल्यावर अर्धा तास तरी विश्रांती घ्यायला विसरू नका. तुम्हाला त्याचीही शुद्ध नसते. मी जाते आता. सांगितलेलं विसरू नका,’’ असं बजावून निर्मलाबाई निघाल्या.
निर्मलाबाई म्हणत होत्या त्यात तथ्य होतंच.
डॉ. शशिशेखरांचं असंच होतं. निर्मलाबाईंनी जेवण आणून दिलं किंवा जेवायची आठवण करून दिली तरच जेवण. काम करताना अतिश्रमानं डोळे मिटायला लागले, की तिथंच पलीकडच्या कक्षात ठेवलेल्या पलंगावर अंग झोकून द्यायचं... मग वेळ कुठलीही असो. जागे झाले की पुन्हा काम सुरू.