Premium|Terrace Fruit Gardening : गच्चीवर फुलवू या फळझाडे...

Fruit Trees in Pots : गच्चीवर योग्य कुंडी, दर्जेदार कलमी रोपे आणि पुरेसा सूर्यप्रकाश असल्यास आंबा, पेरू, डाळिंब, पपईसह अनेक फळझाडांची यशस्वी लागवड करून घरच्या घरी ताजी फळे मिळवता येतात.
Terrace Fruit Gardening

Terrace Fruit Gardening

esakal

Updated on

डॉ. तृप्ती करेकट्टी / डॉ. दिलीप माळी

अनेक फळझाडे महाराष्ट्रातील हवामानात चांगली येतात. गच्चीवरील ऊन, वारे तसेच छतावर वाढणारा बोजा यांचा विचार करता लिंबूवर्गीय फळे, द्राक्षे, चिकू, केळी, डाळिंब, जांभूळ, पपई, पेरू, स्ट्रॉबेरी, राय आवळा, डोंगरी आवळा, चिकू हीदेखील झाडे आपण लावू शकतो.

गच्चीवर लावलेल्या झाडाला फुले, पालेभाज्या, फळभाज्या आल्या की आपल्याला खूप आनंद होतो. पण जेव्हा गच्चीवरच्या झाडाला आंबा लागला किंवा अननस, पेरू, बोरे अशी काही फळे लागली, की होणारा आनंद काही औरच असतो. फळझाडे लावणे वाटते तितके अवघड नाही. एकदा योग्य आकाराची कुंडी निवडून त्यात झाडास अनुकूल असे मातीचे मिश्रण भरले आणि योग्य जातीचे रोप लावून ती कुंडी गच्चीवर व्यवस्थित ठिकाणी ठेवली, की त्यानंतर झाडाची सतत काळजी घ्यावी लागत नाही. त्यामुळे अनेक बाबतीत फळझाडे लावणे खरेतर पालेभाज्या, फळभाज्या लावण्यापेक्षा सोपे असते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com