Male and female health and behavior

Male and female health and behavior

esakal

Premium|Gender Differences in Biology : आम्ही आहोतच वेगळ्या...

Male and female health and behavior : निसर्गाने स्त्री आणि पुरुष यांच्यात शारीरिक आणि मानसिक स्तरावर अनेक मूलभूत भेद केले आहेत, जे एकमेकांना पूरक ठरतात; हे वैज्ञानिक फरक समजून घेतल्यास परस्पर संवाद अधिक सुलभ आणि अर्थपूर्ण होऊ शकतो.
Published on

डॉ. अविनाश भोंडवे

निसर्गानं स्त्री-पुरुष भेद निर्माण केले आहेत, पण त्यात दोन्हींमध्ये एक चांगलं आणि एक वाईट असं नसतं. एकमेकांच्या मर्यादा समजून घेत त्यांना एकमेकांच्या सक्षमतेची जोड दिली, तर आयुष्याचा डाव सुरळीत पार पडतो. पुरुषांना स्त्रियांकडून भावनिक स्थैर्य, संयम, सहानुभूती या गोष्टी शिकायला मिळतात. तर स्त्रिया पुरुषांकडून निर्णयक्षमता, आत्मविश्वास, एकाग्रता या गोष्टी शिकू शकतात.

‘‘अगं, तुला कशी काय थंडी सहन होत नाही? मला तर अगदी छान उबदार वाटतं आहे!’’, ‘‘अरे, पण मला मात्र हा सिनेमा बघून रडू आलं. तुला काहीच कसं वाटलं नाही?’’, ‘‘माझ्या डोक्यात नेहमी लाखो विचार सुरूच असतात. झोपताना मेंदू बंदच होत नाही!’’... आपल्या आयुष्यात असे संवाद आपण कितीतरी वेळा ऐकले असतील किंवा बोललोसुद्धा असू. स्त्री आणि पुरुष यांच्यात नेहमीच काहीना काही भेद असतात, मतभेद तर असतातच. पण हे भेद नेमके कुठून येतात? हे मतभेद कसे निर्माण होतात? हा फक्त सवयींचा खेळ असतो, की यामागं शास्त्र असतं? तसं पाहायला गेलं, तर यामागं नक्कीच शास्त्र आहे. निसर्गानं स्त्रियांना आणि पुरुषांना वेगवेगळ्या साच्यात घडवलं आहे. हे वेगळंपण कुठं आहे, ते समजून घेणं ज्ञानरंजक तर ठरतंच, पण मनोरंजकही ठरत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com