Diamond heists and thieves
Esakal
राधिका परांजपे - खाडिलकर
हिऱ्यांचं चमचमतं वलय इतकं आकृष्ट करणारं असतं, की चोरही त्याला अपवाद कसे असतील? मौल्यवान वस्तूंची, कागदपत्रांची चोरी आणि नक्कल करणाऱ्या गुन्ह्यांसाठी व्हाइट कॉलर क्राइम्स हा शब्द अस्तित्वातही यायच्या आधीपासून होणाऱ्या हिरे चोऱ्या आजवर अनेक उभरत्या चोरांचं, चित्रपट आणि वेब सीरिजचं आकर्षण ठरल्या आहेत. कुठल्याही काल्पनिक चित्रपटाच्या कथानकाला लाजवतील अशा काही हिऱ्यांच्या खऱ्याखुऱ्या चोऱ्यांविषयी...
‘देअर इज नो सच थिंग अॅज अ फुलप्रुफ सिस्टीम. दॅट आयडिया फेल्स टू टेक इन्टू अकाउंट द क्रिएटिव्हिटी ऑफ फूल्स...’ जगप्रसिद्ध हिरे चोर, कॉन मॅन फ्रँक अॅबग्नेलचं हे नेहमीचं वाक्य. जगात फुलप्रुफ अशी कोणतीही सुरक्षा व्यवस्था नाही, कारण प्रत्येकच सुरक्षा व्यवस्था ‘फूल्स’ची सर्जनशीलता विचारात घेत नाही (उलट काही अंशी कमीच लेखते) अशा आशयाच्या या वाक्यात फ्रँक ‘फुल’ (Full) आणि ‘फूल’मध्ये (Fool) शब्दच्छल करत हिरे चोरांच्या आत्मविश्वासाबद्दल बरंच काही सांगून गेलाय... हे वाक्य म्हणजे हिऱ्यांची भुरळ पडलेल्या समस्त ‘ज्वेल थीफ’ वर्गाचं जणू ब्रीदवाक्यच! अचंबित करणाऱ्या काही हिरे चोऱ्यांविषयी...