
व्यंकटेश उपाध्ये
आम्ही थेट बोन चर्चच्या दिशेनं कूच केली. दारापाशी उभ्या असलेल्या गाइडबाईंनी स्वागत केलं. ही ऑशुअरी एका सेमेट्रीच्या म्हणजे कबरीस्तानाच्या तळघरात आहे. इथं ४० ते ७० हजार मानवी हाडांपासून तयार केलेल्या ‘कलाकृती’ असून, त्या चॅपलची संपूर्ण सजावट फक्त हाडांपासूनच केलेली आहे. त्या ठिकाणाची माहिती ऐकत असताना आश्चर्य, भय, किळस अशा अनेक प्रकारच्या उद्गारांनी चॅपल गजबजलं होतं. आम्हीही दिङ्मूढ होऊन हा सगळा प्रकार पाहत होतो.