Premium|Diamonds in Movies: चित्रपटसृष्टीत हिऱ्यांचे आकर्षण; बॉलिवूड-हॉलिवूडचा हिरा प्रेम

Diamonds: चित्रपटसृष्टीत हिऱ्यांचे अनोखे आकर्षण; बॉलिवूड-हॉलिवूडच्या कथानकांचा केंद्रबिंदू
Diamands

Diamands

Esakal

Updated on

हर्षदा वेदपाठक

हिरा केवळ दागिना नाही तर चित्रपटसृष्टी, फॅशन आणि स्टेटस यांचं प्रतीक आहे. चोरीच्या कथानकांपासून ते हॉलिवूड-बॉलिवूड स्टार्सच्या एंगेजमेंट रिंगपर्यंत, हिऱ्याचं आकर्षण सदासर्वदा टिकून आहे.

बॉलिवूड आणि हॉलिवूड या दोन्ही चित्रपटसृष्टींसाठी हिरा हा नेहमीच आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिला आहे. हिऱ्याच्या मोहकतेला सर्वदूर पोहोचवण्यात चित्रपटांनी मोठा वाटा उचलला आहे. ब्लड डायमंड, सायबेरिया, नथिंग लास्ट्स फॉरएव्हर, डायमंड इज अनब्रेकेबल, डायमंड नेकलेस, डायमंड डॉग यांसारख्या चित्रपटांनी हिऱ्याची जादू रुपेरी पडद्यावर आणली. उरलेले श्रेय जाते जेम्स बॉन्डच्या चित्रपटांना. या मालिकेतील अनेक चित्रपटांत हिऱ्याला विशेष स्थान मिळालेले दिसते. जेम्स बॉन्डच्या चित्रपटांतील नायिका जितक्या अप्रतिम असतात, तितकेच या चित्रपटांत हिऱ्याचे आकर्षण आणि महत्त्वही उठून दिसते.

हिंदी चित्रपटसृष्टीकडे पाहिले तरी हिरा अनेक कथानकांच्या केंद्रस्थानी राहिल्याचे दिसते. हिऱ्याच्या चोरीपासून ते रोमांचक कारस्थानांपर्यंतच्या अनेक कथा हिंदी चित्रपटांत रचल्या गेल्या आहेत. यात प्रामुख्याने ज्वेल थीफ (१९६७), सच्चा झूठा (१९७०), व्हिक्टोरिया नंबर २०३ (१९७२), यादों की बारात (१९७३), हिरा पन्ना (१९७३), शालीमार (१९७८), शान (१९८०), कालिया (१९८४), दिल्ली बेली (२०११) आणि हॅपी न्यू इअर (२०१४) या चित्रपटांची नावे आवर्जून घ्यावी लागतील.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com