Diamand
Esakal
सम्राट कदम
पृथ्वीवरील मौल्यवान खनिजांपैकी एक असलेला हिरा वैज्ञानिक संशोधनांसाठीही मौल्यवान आहे, कारण हिऱ्यामुळे केवळ पृथ्वीच्या गर्भातील विज्ञान कळत नाही, तर भविष्यात येऊ घातलेल्या तंत्रज्ञानाची झलकही पाहायला मिळते.
मानवाला ज्ञात असलेल्या सर्वात कठीण खनिजाचे अर्थात हिऱ्याचे विज्ञानही तेवढेच रंजक आणि आश्चर्यकारक आहे. हिऱ्यांचा सर्वात प्राचीन उल्लेख इ.स. पूर्व ३२०-२९६ दरम्यानच्या एका संस्कृत हस्तलिखितामध्ये आढळतो, जिथे त्यांचा उल्लेख मौल्यवान सामग्री म्हणून केला आहे. अनेक संस्कृत संदर्भांत ‘वज्र’ या नावाने हिऱ्याची ओळख आली आहे. इ.पू. ७०० ते ५०० दरम्यान भारतातच हिऱ्यांच्या खाणींचा उद्योग सुरू झाल्याचे अभ्यासक सांगतात. गोलकोंड्यातील (गोवळकोंडा) हिऱ्यांच्या खाणी जगभरात प्रसिद्ध होत्या. (आत्ताच्या) आंध्र प्रदेशातील कोल्लूर खाणीतून काढलेला ‘कोह-ए-नूर’ अर्थात कोहिनूर जगाच्या आकर्षणाचे केंद्र ठरला आहे, हे सर्वज्ञात आहेच.
असा हा हिरा एक दुर्मीळ आणि मौल्यवान खनिज पदार्थ आहे. पृथ्वीच्या भूकवचाखाली आढळणारा आणि कार्बन मूलद्रव्यापासून तयार झालेला हिरा कोळशाचाच जुळा भाऊ आहे. म्हणजेच रासायनिकदृष्ट्या दोन्हींमध्ये समानता आहे. जगातला सर्वात