Premium|Weather Change: सह्याद्रीतील पावसाचे बदलते रूप; महाराष्ट्राच्या विकासावर गंभीर परिणाम

Climate Change: भारतात सर्वांत जास्त पाऊस पडणाऱ्या चेरापुंजीला ताम्हिणी घाटाने सलग दुसऱ्या वर्षी पावसाळ्यात मागे टाकले आहे..
Weather Change sahyadri

Weather Change sahyadri

Esakal

Updated on

पृथ्वीच्या तापमानात गेल्या काही दशकांपासून सातत्याने झालेली वाढ आता केवळ आकडेवारीपुरती मर्यादित राहिलेली नाही, तर प्रत्यक्षात ठळकपणे जाणवू लागली आहे. आफ्रिका खंडाचे तापमान जागतिक सरासरीपेक्षा जास्त वेगाने वाढते आहे, असा निष्कर्ष ‘सेंटर फॉर सायन्स अॅण्ड एन्व्हायर्न्मेंट’च्या (सीएसई) एका अहवालातून समोर आला आहे. ही केवळ आफ्रिकेची गोष्ट नाही; महाराष्ट्रातील सह्याद्रीसह संपूर्ण देशही याच हवामान बदलाच्या सावटाखाली आहे.

गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रात पडलेल्या पावसाच्या आक्राळविक्राळ रूपाने हे पुन्हा अधोरेखित केले आहे. सह्याद्रीचे कडे, डोंगर, घाट आणि दऱ्यांवर शतकानुशतके पावसाळ्यात संततधार पाऊस पडतो. पण, गेल्या काही वर्षांपासून संततधारेची जागा कमी वेळेत मुसळधार पडणाऱ्या पावसाने घेतली आहे. पावसाच्या या बदलत्या रूपामुळे सह्याद्रीचे कडे जागोजागी कोसळत असल्याचे दिसते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com